शहरात मुख्य नाले सफाई मोहिमेस मंगळवार पासून सुरुवात..

अमळनेर (प्रतिनिधी) पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील मुख्य नाले सफाई मोहिमेस मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रशांत सरोदे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिन्हाडे, हैबतराव पाटील यांनी शहरातील प्रमुख नाले पावसाळ्यापूर्वीच जे.सी.बी मशिनच्या साह्याने नासे सफाईस सुरुवात केली आहे. यासाठी

तीन पथकांची नियुक्ती करून तिन जे.सी.बी च्या सहाय्याने नाले सफाईचे काम सुरू आहे.
मंगळवारपासून पिंपळे रोड, अॅड. ललिता पाटील
यांच्या घरासमोरील फरशीपूलपासून सफाई सुरुवात करण्यात आली. तसेच धुळेरोड आर. के. फॅक्टरी मागून नालेसफाईची सुरुवात करण्यात आली आहे. बालेमियाँ दर्गाच्या कोपऱ्यापासून सरळ बसस्थानक पर्यंत नालेसफाईची सुरुवात करण्यात आली. अमळनेर नगरपरिषद कडून शहरातील सर्व नालेसफाई करण्यात येणार असून या मोहिमेत मुकादम ज्ञानेश्वर संदानशिव व सागर पवार, अनिल बाविस्करसह शामराव करंदीकर, गणेश ब्रह्मे, महेंद्र बिऱ्हाडे आदी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.