३६ उमेदवारांचे ६८ अर्ज दाखल अर्बन बँक साठी इच्छुकांची भाऊगर्दी..

अमळनेर(प्रतिनिधि)-येथील अमळनेर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत १० तारखेपर्यंत एकूण १३ जागांसाठी ६८ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
यावेळी विद्यमान संचालक असलेल्या सहकार पॅनलच्या सर्वच उमेदवारासह ३६ उमेदवारांनी ६८ अर्ज निवडणूक अधिकारी व्ही.एम.जगताप यांच्याकडे दाखल केले आहेत.एकूण १३ जागांसाठी निवडणूक होत असून यात ८ जागा सर्वसाधारण,२ महिला राखीव,१ व्हीजेएनटी,१ अनुसूचित जाती जमाती तर १ जागा इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (११ मे)शेवटचा दिवस असून अनेक मातब्बर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे.उमेदवार व त्यांच्या समर्थकांची बँकेच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.