रोटरी क्लब अमळनेरचा (६७ वा संस्थापन दिन) चार्टर्ड डे उत्साहात संपन्न..

अमळनेर (प्रतिनिधि) रोटरी क्लब अमळनेरच्या चार्टर्ड डे अर्थात ६७वा संस्थापन दिन प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे उत्साहात संपन्न झाला. सर्वप्रथम ९ मे १९५६ रोजी रोटरी क्लब अमळनेरची मुहूर्त मेढ रोवली गेली होती. रोटरी सभेसाठी सर्वप्रथम प .पू. श्रीमंत प्रताप शेठजी यांनी प्रताप तत्त्वज्ञान केंद्राची जागा नाममात्र एक रुपये भाड्याने रोटरी क्लब अमळनेरला सुमारे पन्नास वर्षे उपलब्ध करून दिलेली होती. गेल्या वीस वर्षापासून रोटरी क्लबचे स्वतःचे सभागृह आता खा.शी. मंडळाच्या पी.बी.ए.इंग्लिश मीडियम स्कूल जवळ आहे. रोटरी चे सर्वप्रथम अध्यक्षपद रोटे.डॉ.मोने यांना प्राप्त झाला होता त्यानंतर अनेक दिग्गज एडवोकेट काकासाहेब राणे, विप्रोचे मॅनेजर वांसिया,डॉ. अप्पासाहेब म्हसकर , वा.रा. सोनार ,राम कुलकर्णी, प्रा. र.का.केले पासून अनेक दिग्गज डॉक्टर्स ,वकील ,प्राध्यापक, कारखानदार, व्यापारी वर्ग आदींनी रोटरी क्लब अमळनेर ची सामाजिक सेवेची उज्वल परंपरा आज पावेतो निरंतर सुरू ठेवलेली आहे. यात अनेक समाजउपयोगी कामे उदा, वेळोवेळी विविध प्रकारचे मेडिकल कॅम्पस्, गरजूंसाठी विनामूल्य मोतीबिंदूचे ऑपरेशन आतापर्यंत हजारो रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे. पोलिओ निर्मूलन, विविध ठिकाणी पाण्याचे बोरिंग व पाणपोई ,राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा, युवकांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धाचे आयोजन वगैरे करून आपले सामाजिक दायित्व निभवण्याचे प्रयत्न केलेला आहे. यावर्षी रोटरी क्लब अमळनेरने भव्य असे ” रोटरी उत्सवचे” आयोजन करून अमळनेर तालुक्यातील सुमारे ७५००० नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला होता व रोटरी डिस्टिक३०३० मध्ये मानाच्या तोरा रोवलेला आहे.
याप्रसंगी” मी अनुभवलेली रोटरी “या विषयावर सर्व उपस्थित माजी रोटरी अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटे गनी मेमन माजी असिस्टंट गव्हर्नर जळगाव, रोटे आशिष गुजराथी माजी असिस्टंट गव्हर्नर, चोपडा, रोटेरियन भोळे माजी असिस्टंट गव्हर्नर जळगाव व रोटे अनिल अग्रवाल चोपडा खास उपस्थित होते. या प्रसंगी सर्व माजी अध्यक्षांच्या यथोचित सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे रोटे गनी मेमन यांनी आपले संभाषणात सांगितले की काही प्रसंगी पद,पैसा आणि प्रतिष्ठा कामात येत नाही हे आपण कोविड काळात अनुभवलेले आहेच तर आपण जोडलेली माणसं मित्रपरिवार हे फार मोठे काम करून जात असते तरी रोटरी ही बंधुभाव आणि मित्र वाढविणारी संघटना असून त्याचे आपण जास्तीत जास्त उपयोग करून सामाजिक ऋण फेडण्याचे योगदान करावे असे त्यांनी सुचविले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांना गनी मेमन यांना डॉ.शरद बाविस्कर यांनी त्यांचे काढलेले चित्र सप्रेम भेट दिले. याप्रसंगी सीनियर रोटेरियन शशांक जोशी वअनिल भाई शाह यांच्या हस्ते चार्टर्ड डे निमित्ताने केक कापण्यात आला. या प्रसंगी रोटेरीयन्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ताहा बुकवाला व सूत्रसंचालन अजय रोडगे तर आभार प्रदर्शन प्रेसिडेंट रोटेरियन कीर्तीकुमार कोठारी यांनी केले.