बाळापुर ते आर्णी रस्त्याला जोडणारा जुन्या कोळी नाल्याचा पुलाचे कामाचा शुभारंभ आ. फारूक शाह यांचे हस्ते…

धुळे (अनिस अहेमद) धुळे हद्दवाढीने समाविष्ट झालेल्या गावात मूलभूत सोई सुविधा पुरविण्यासाठी धुळे महानगरपालिका अपयशी ठरली आहे.मोठ्याप्रमाणात मालमत्ता कराची रक्कम

नियमितपणे अदा करूनदेखील सुविधा न देणाऱ्या पालिकेच्या विरोधात गावातील नागरिकांमध्ये मोठ्याप्रमाणात असंतोष पसरलेला आहे.या भागातील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार आ.फारुख शाह यांनी ग्रामविकास विभागाकडे तगादा लावला त्यानुसार ग्रामविकास विभागाने २५१५ लेखाशीर्ष अंतर्गत निधी उपलब्ध करून दिलेला आहे.
आतापर्यंत आ.फारुख शाह यांनी धुळे शहराच्या विकासासाठी नगरविकास विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,उद्योग विभाग,सामाजिक न्याय विभाग,अल्पसंख्यांक विभाग,क्रीडा विभाग ,महिला व बालकल्याण विभाग मार्फत मोठ्याप्रमाणात निधी खेचून आणला आहे.धुळे मतदारसंघात निव्वळ शहरी भागाचा समावेश आहे.अशापरिस्थितीत शहराच्या विकासासाठी ग्रामविकास विभागाकडून निधी खेचून आणण्याची किमया आ.फारुख शाह यांनी केली आहे. त्याअंतर्गत धुळे मनपा क्षेत्रात हद्दवाढीने समाविष्ट झालेल्या बाळापूर, ता.धुळे येथे बाळापुर ते आर्णी रस्त्याला जोडणारा जुन्या कोळी नाल्याचा पुलाचे बांधकाम करणे. या ३० लक्ष खर्चाच्या कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी आ.फारुख शाह यांच्यासोबत सुमित पवार,अमित पवार,प्यारेलाल पिंजारीआसिफ शाह ,प्रकाश मराठे,विनायक मराठे, भटू पाटील,अशोक मराठे,दिलीप वानखेडे,सुधीर मराठे,आकाश मोरे,राजेंद्र बैरागी,राहुल मराठे,सचिन रणमळे ,कैलास पवार,यशवंत पाटील,अनिल जगताप आदी उपस्थित होते..