पती पासुन विभक्त महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत फसवणूक केल्याने एका विरुद्ध अट्रोसिटी गुन्हा दाखल.

.
एरंडोल (प्रतिनिधी ) एरंडोल तालुक्यातील विखरन येथील एकाने जळगाव येथील पती पासुन विभक्त महीले सोबत तब्बल तिन वर्ष संबंध ठेवत लग्न करण्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याने त्याच्या विरोधात महिलेने अट्रोसिटी चा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान एरंडोल पोलीस स्टेशन वरून मिळालेल्या माहिती नुसार जळगाव येथील पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी ३५ वर्षीय महिला ही साड्या विक्रीचा व्यवसाय करते.तिला साड्या घेण्यासाठी नेहमी जळगाव येथुन सुरत जावे लागायचे याप्रसंगी २०२० मध्ये तिचे प्रवासा दरम्यान एरंडोल तालुक्यातील विखरन येथील अंकुश मारुती महाजन या इसमासोबत ओळख झाली व ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले तसेच यावेळी सदर महिला ही विवाहीत होती.तिला दोन मुली पण आहेत.त्या दोघींना मी सांभाळून घेईल असे आमिष दाखवून एरंडोल जळगाव हायवे क्र.६ वरील रस्त्यावरील ओम शिवरत्न फॉर्म हाऊस वर नेऊन सतत तिन वर्ष शारीरिक संबंध ठेवले तसेच अंकुश याने सांगितल्याने दि.१७ जानेवारी २०२३ रोजी सदर महिलेने आपल्या पतीला पंच फारकत दिली.त्यानंतर देखील अंकुश याने सदर महिलेस लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले.शेवटी अंकुश याने लग्नास नकार दिल्याने सदर महिलेने एरंडोल पोलीस स्टेशनला अंकुश विरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत फसवणूक केल्याने अट्रोसिटी गुन्हा दाखल केला आहे.