बारावीच्या विद्यार्थ्यांचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला;बहुलखेडा शिवारातील घटना..

0


जरंडी (साईदास पवार) शीर धडा वेगळे झालेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत विहिरीत तरंगताना आढळून आल्याची घटना शुक्रवारी पहाटे आठ वाजता उघसडकीस आली आहे घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला.याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे…मात्र धडा वेगळे झालेले शीर मृतदेह कुजलेला अवस्थेत असल्याने पाण्यात गळून पडले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे…
अविनाश उर्फ बंटी दगडू तडवी(वय १८ रा. कवली ता सोयगाव) असे विहिरीत तरंगून आढळलेल्या मृताचे नाव आहे शुक्रवारी पहाटे बहुलखेडा शिवारातील सुरेश परमाणे रा.पिंपळगाव हरे (ता पाचोरा) यांच्या गट क्र-१३८ मध्ये कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला याप्रकरणी कवली गावचे पोलीस पाटील निवृत्ती केंडे व बहुलखेड्याचे पोलीस पाटील चंद्रसिंग राठोड यांनी पोलिसांना तातडीने घटनेची माहिती दिली त्यावरून सोयगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून पुढील कारवाई केली दरम्यान मृत विद्यार्थ्यांचे धडा वेगळे शीर असलेल्या कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने बहुलखेडा कवली गावात खळबळ उडाली आहे दरम्यान विहिरीत कुजलेल्या अवस्थेत शीर धडा पासून पाण्यात विहिरींच्या तळाशी गळून पडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे..मृत अविनाश तडवी हा कवली ता सोयगाव येथील रहिवासी होता तो (दि.१)पासून घरातून निघून गेलेला होता.गावाजवळ च असलेल्या बहुलखेडा शिवारात विहिरीत त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे..दरम्यान घटनास्थळी मृतदेहाचे स्पॉट शवविच्छेदन करून नातेवाईकांना अंत्यसंस्कार साठी शव देण्यात आले दुपारी तीन वाजता मृत अविनाश वर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले पुढील तपास पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजू बर्डे रवींद्र तायडे आदी करत आहे..या घटनेमुळे कवली व बहुलखेडा गावात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.. मृत अविनाश च्या पश्चात आई वडील दोन भाऊ एक बहीण असा परिवार आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!