जरंडी गावाला ऐन उन्हाळ्यात दररोज नळाद्वारे पाणीपुरवठा; ग्रामपंचायतीचा उपक्रम

जरंडी (साईदास पवार)..ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात ग्रामस्थांना रोज थंड व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जरंडी ग्रामपंचायतीने कम्बर कसली आहे त्यामुळे गावात रोज पाणी पुरवठा होत असल्याने गावाच्या उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाण्याच्या समस्या दूर होऊन ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासह आरोग्याचा प्रश्न दूर झाला आहे…
धिंगापूर धरणासह गारगोटी धरणातील पुरवठ्याची विहीर पुन्हा खोल करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी विशेष मासिक बैठक आयोजित करून उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणी टंचाई पासून दूर ठेवण्याचा संकल्प जरंडी ग्रामपंचायत ने घेतला आहे सध्या ग्रामपंचायत अनेक अडचणींवर मात करून गावात दररोज थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करत आहे त्यामुळे ऐन वाढत्या तापमानात ग्रामस्थांना रोज पिण्याचे पाणी मिळत असून ग्रामपंचायतने माझी वसुंधरा योजनेत गावाच्या पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा संकल्प केला आहे सरपंच वंदनाबाई पाटील उपसरपंच संजय पाटील ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाटील यांच्या संकल्पनेतुन हा उपक्रम हाती घेतला असून गारगोटी धरणांतील विहीर तातडीने पुन्हा तीस फूट खोल करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाटील आग्रही झाले आहे त्यासाठी सोमवारी तातडीची मासिक बैठक घेवून मे आणि जून या दोन महिन्यांत जरंडी गाव दुष्काळ मुक्त व टँकर मुक्त ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे याकामी लिपिक संतोष कुमार पाटील पाणी पुरवठा कर्मचारी अमृत राठोड अरुण कोळी सतीश बाविस्कर आदींनी पुढाकार घेतला आहे
——गावात दररोज तासभर पाणी पुरवठा
दरम्यान ऐन उन्हाच्या कडक्यात जरंडी ग्रामपंचायत ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचे नियोजन करून तासभर पाणी पुरवठा करत आहे
—-,ग्रामस्थांना आवाहन
जरंडी गावासाठी रोज तासभर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे परंतु ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई होवू नये यासाठी ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी झाल्या वर नळ ची तोटी बंद करून ग्रामपंचायत ला सहकार्य करावे असे आवाहन सरपंच वंदनाबाई पाटील ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांनी केले आहे……