अमळनेररात धाडसी चोरी २ लाख ९१ हजाराचा मुदेमाल चोरून चोरटे पसार..

अमळनेर(प्रतिनिधि) अमळनेर येथील सप्तशृंगी कॉलनित १३ मे रोजी धाडसी चोरि झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चोरट्यांनी शहरातील पिंपळे रस्त्यावरून चार चाकी चोरून मुंदडा पार्कमधील दागिन्यांचे दुकान फोडून कार व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दिनांक १३ मे रोजी पहाटे घडली मनीष प्रकाश सोनार यांचे कॉलनीतील मानसि ज्वेलर्स व कॉस्मेटिक दुकान आहे. दुकानासमोरील शुभम खंबायत हे राहतात याना पहाटे जाग आल्यावर समोरील दुकानात चोर चोरी करत असल्याचे दिसून आले त्यांनी मनीष ला पहाटे साडेतीन वाजता फोन केला की तुमच्या दुकानात सिल्वर रंगाची चार चाकी क्रमांक 15 59 मधून चार जण आले दुकानाचे शटर चे कुलूप तोडून दुकानात चोरी करत असल्याचे मी पाहिले आरोळ्या मारताच ते मुदे माल घेऊन पसार झाले असे सांगितले मनीषने दुकानात येऊन पाहिले असता दुकानातील एक लाख वीस हजार रुपयांचे 41 ग्राम सोन्याचे दागिने 50 हजार रुपयांचे दीड किलो चांदीचे दागिने व पन्नास हजार रुपये रोख आणि एक हजार रुपयांचे इलेक्ट्रिक साहित्य असा दोन लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे निदर्शनास आले मनीषने रात्रीच पोलिसांना कळवले मात्र पोलीस येईपर्यंत चोरटे शहरा बाहेर फरार झाले होते डीवाय एसपी राकेश जाधव पोलीस निरीक्षक विजय शिंदे पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांच्यासह पोलिसांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला अमळनेर पोलिसांनी जळगाव येथील ठसे तज्ञ मागवले होते दरम्यान सदर चोरटेस सराईत असल्याचे दिसून आले चोरी करताना त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा चा डीविआर सुध्दा चोरून नेले चोरी करताना सीसीटीवित दिसणार नाहीत आणी चोरटे ज्या कार ने आले होते ती कार त्यांनी पिंपडे रोड येथून चोरलेली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी करीत आहेत.