वरातीत नवरदेवाला तलवार घेऊन नाचणे पडले महागात. चौघा विरुद्ध गुन्हा दाखल.

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर लग्नाच्या वरातीत तलवार हातात घेऊन भोईवाडा भागात १६ रोजी दुपारी केला. २:३० वाजण्याच्या सुमारास लग्नाची मिरवणूक कसाली मोहल्ल्यातून जात असताना, डीजेचालक यशवंत शिंगाणे (२७) याने गाणे लावताच, नवरदेव विकी कोळी (२५) हा तलवार घेऊन खाली उतरला आणि नाचू लागला. लागलीच किरण कोळी (२४, भोईवाडा) व त्यांचा साथीदार विकी कोळी (२७, मांजरोद, ता. शिरपूर) हे
दोघेही तलवार घेऊन नाचू लागले. एका गटाला चिथावणी देत होते. त्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेले पोलिस जितेंद्र निकुंभे व होमगार्ड रवींद्र पाटील यांनी त्यांना चिथावणीखोर कृत्य करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न
डीजे चालकालाही गाणे बंद करण्यास सांगितले. मात्र, कोणीच ऐकून घेतले नव्हते, म्हणून निकुंभे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले असता, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, दीपक माळी, शरद पाटील, मिलिंद भामरे, शेखर साळुंखे, गणेश पाटील हे घटनास्थळी हजर झाले. मिरवणूक लग्नासाठी भोईवाड्यात निघून गेली.