वरातीत तलवारीसह नाचणाऱ्या नवरदेवासह तीन आरोपींना अटक.

अमळनेर (प्रतिनिधि) १६ रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास कसाली मोहल्ल्यात नवरदेवासह तिघांनी एका चिथावणीखोर गाण्यावर तलवारी दाखवली. हातात धरून नाच केल्या प्रकरणी नवरदेवानसह तीन आरोपींना अटक करण्यात आली व
चामुंडा डीजे, तलवारी आदी साहित्य जप्त करण्यात आले. लग्नाचा सर्व विधी आटोपल्यावर दुसऱ्या दिवशी १७ रोजी नवरदेव विकी गोपाळ कोळी (२५) यालादेखील अटक केली. सर्व आहे. आरोपींना हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील, कमलेश बाविस्कर, अमोल देशमुख घनश्याम पवार, नरेंद्र बडगुजर यांनी न्यायालयात हजर केले असता न्या. एस. एस. अग्रवाल यांनी त्यांना सुनावली.
न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपींनी जामिनासाठी अर्ज दाखल केल्याने जामीन मंजूर करण्यात
काही दिवसांपूर्वी कसाली मोहल्ल्यात झालेल्या दोन गटांतील दगडफेकीतील आरोपी विशाल दशरथ चौधरी (२७ व अब्बासखान हुसेन (५२) यांनाही पोलिसांनी अटक केली
पोलीस उपनिरीक्षक भय्यासाहेब देशमुख यांनी न्यायालयात हजर केले असता न्या. एस. एस. अग्रवाल यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी..