अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या आठ वाहनांवर कारवाई…

एरंडोल ( कुंदन ठाकुर )
एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा बांभोरी तालुका धरणगाव या परिसरातून अवैध वाहतूक करणाऱ्या आठ वाहनांना एकाच वेळी रंगेहात पकडण्यात आले या कारवाईमुळे अवैध वाहतूक तस्करांचे धाबे दणाणले आहे.
प्रांत अधिकारी मनीष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुचिता चव्हाण नायब तहसीलदार सातपुते किशोर माळी दिलीप पाटील मंडळ अधिकारी मनोज शिंदे पंकज शिंदे सलमान तडवी कटारे आरिफ शेख राहुल देरंगे मधु पाटील पंकज सोनवणे यांच्या पथकाने अवैध वाळू चोरी विरोधात सदरची कार्यवाही केली.