एरंडोल येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगतच्या समांतर रस्त्यांचे भिजत घोंगडे…….!

प्रतिनिधि -कुंदन ठाकुर
एरंडोल येथे बस स्थानकापासून नदगाव रस्त्यापर्यंत राष्ट्रीय महामार्ग सहा लागत दोन्ही बाजूंना समांतर रस्त्यांचा प्रश्न अजूनही भिजत घोंगडे आहे वास्तविक या भागातील चौपदी करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे दिसून येते असे असताना महामार्गाच्या दोन्ही बाजूला या परिसरात समांतर रस्ते गटारी लाईट जंक्शन यांच्यासह सर्व संसाधने उपलब्ध करून देण्याकडे हेतूतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे एरंडोलकरांचा हा प्रश्न खासदार उन्मेष पाटील व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील यांनी पुढाकार घेऊन न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एरंडोल येथे कासोदा नाक्यापासून बस स्थानकापर्यंत महामार्गालगत दोन्ही बाजूंना समांतर रस्त्यांचे काम नही च्या नकाशात दर्शविण्यात आलेले नाही त्यामुळे हे काम चौपदी करण्याच्या कामासोबत मार्गी लग्नाची शक्यता दिसत नाही असे जन माणसातून बोलले जाते चौपदी करण्याच्या कामात इतर गावांना सर्व सुविधा आले असताना एरंडोल शहरावर कृपादृष्टी का होत नाही या मागचे गौळ बंगाल काय एरंडोल शहर व तालुका हा केवळ राजकीय लाभ उठविण्यासाठी वापरला जातो का सुख सुविधा का पुरवल्या जात नाही अशी संताप जनक प्रतिक्रिया सर्व स्थरातून उमटत आहे नंदगाव फाटा ,अमळनेर नाका, पिंपरी फाटा या तीन ठिकाणी जंक्शन दिले नाही तर ही तिन्ही स्थळे अपघात स्थळे म्हणून भविष्यात अनुभवास येतील असे जाणकारांचे मत आहे एरंडोल येथील समांतर रस्ते व प्रवाशांची सुरक्षितता यासंदर्भात लवकरच येथे सर्वपक्षीय संघर्ष समिती स्थापन करण्याचा मनोदय काही युवा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे…