प्रभाग क्रमांक 12 मध्ये बाबा बर्तनवाले यांच्या घरापासून ते अलशबाब शाळेपावेतो काँक्रिट रस्ता व गटार कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न..

धुळे (अनिस अहेमद) धुळे शहरातील अल्पसंख्याक भागात मुलभूत सुविधा जसे रस्ते,गटारी,पाण्याची पाईप लाईन यासाठी आजपर्यंत लोक

प्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे या भागाचा विकास थांबलेला होता. कॉलनी व वस्त्यांमध्ये रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात नागरीकांचे हाल होत होते. त्या सगळ्या गोष्टींचा आमदार फारुख शाह यांनी अभ्यास करून ज्या भागात रस्ते नाही. गटारी नाही,पाईप लाईन नाही. यासाठी निधी उपलब्ध करून कामाचा सपाटा लावलेला आहे. मिल्लत नगर,अलशबाब शाळा परिसरातील नागरिकांची सोई सुविधांच्या आभावी प्रचंड परवड होत होती.नागरिकांची गैरसोय लक्षात घेवून आ. फारुख शाह यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियानअंतर्गत प्रभाग क्रमांक 12 मध्ये बाबा बर्तनवाले यांच्या घरापासून ते अलशबाब शाळेपावेतो काँक्रिट रस्ता व गटार करणे या कामासाठी ५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्याचे आज आ.फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. अलाशबाब संपन्न झालेल्या या कार्यक्रमास आ.शाह यांच्या सोबत जलील अहमद,साजीद साई, प्यारेलाल पिंजारी,इकबाल शाह, मौलवी शकील,छोटू माच्छिवाले,शाहिद शाह, हलीम शमसुद्दिन,कलीम अन्सारी,जाकिर शाह,इब्राहीम तांबोळी,हाजी अब्दुल रऊफ अन्सारी,मुस्ताक अन्सारी,वाहिद मास्टर,अजहर सय्यद, सउद आलम, आदी उपस्थित होते.रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी यांनी समाधान व्यक्त केले आणि आ.फारुख शाह यांचे आभार मानले.