महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक 12 व 19 मिल्लत नगर भागात काँक्रिट रस्ता कामाचे सलीम शाह यांचेहस्ते शुभारंभ…

धुळे (अनिस अहेमद) धुळे शहर विधानसभा मतदार संघाचे आमदार फारुख शाह यांनी कामाचा धडाका सुरू केला आहे.राज्य शासनाच्या विविध

योजनांचा अक्षरश: पाऊसच धुळे मतदार संघात पाडला आहे.शहरातील विविध भागात एक दिवसाआड कामांचा शुभारंभ आमदारांकडून केला जात असल्याने धुळेकर जनता सुखावत आहे.नागरिकांनी मागणी करायची आणि आमदारांनी काम करायचे असा नित्यक्रम ठरलेला आहे.मिल्लत नगर मधील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक 12 व 19 मिल्लत नगर भागात काँक्रिट रसत्यासाठी ५० लक्षचा निधी मंजूर करण्यात आला.सर्व प्रशासकीय. प्रक्रिया पार पडून आ.सलीम शाह यांचे हस्ते प्रभाग क्रमांक 12 व 19 मिल्लत नगर भागात विविध ठिकाणी काँक्रिट रस्ता तयार करणे कामाचा शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी सलीम शाह यांचे सोबत मुक्ती कासिम जीलानी,आमिर पठाण,मौलवी अकीम,साजीद साई,निजाम सैय्यद,इब्राहीम पठाण,वसिम अक्रम,शोएब मुल्ला,माजीद पठाण, हलीम शमसुद्दिन शहजाद मंसुरी,इकबाल शाह,जमील खाटीक,शाहिद शाह,मुद्दसार शेख,जियाउद्दिन मिर्झा,,आलिम शेख,सलमान अन्सारी, सऊद आलम,हबीब अन्सारी,अल्ताफ पठाण,,अलिमोद्दिन शेख,साजीद पठाण,कैसर सैय्यद,
आदी उपस्थित होते.रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याने मिल्लत नगर परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.