रिंगणगाव येथे ७० क्विंटल मका पेटवून दिला.. आगीत एक लाख २६ हजार रुपयांचे नुकसान..

एरंडोल(प्रतिनिधि) एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे रवींद्र काशिनाथ रोहिमारे यांच्या शेतात ठेवलेला ७० क्विंटल गुळ लावून ठेवलेला मका आरोपी यशवंत माधवराव पाटील, याने पेटवून दिला ही घटना २२ मे २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली या आगीत एक लाख २६ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला २२ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील ,रवींद्र तायडे अखिल मुजावर, मिलिंद कुमावत हे पुढील तपास करीत आहेत.