एरंडोल तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत सहकार पॅनल पटकावल्या सर्व १५ जागा,…..
— पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांचे सहकारात पुन्हा एकदा वर्चस्व…..

0

एरंडोल (प्रतिनिधि) येथील एरंडोल तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीसाठी २१ मे रोजी मतदान होऊन २२ मे रोजी सकाळी म्हसावद रस्त्यावरील आयटीआय प्रशिक्षण केंद्रात सकाळी आठ वाजेपासून बारा वाजेपर्यंत मतमोजणीचे कामकाज झाले. दुपारी बारा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी गुलाब पाटील यांनी सर्व जागांचे निकाल घोषित केले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलला घवघवीत यश मिळाले. सहकार पॅनलचे १५ उमेदवार विजयी झाले. या आधी माघारीच्या दिवशी संजय पवार यांच्या पत्नी सोनल पवार व प्रतिभा दिनेश पाटील या दोन महिला उमेदवार महिला राखीव जागेतून बिनविरोध निवडून आलेले आहेत उर्वरित १३ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत 13 उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते संभाजी शिवाजी चव्हाण यांना ६८१ इतकी मिळाली आहे.
मतदार संघ निहाय विजय उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे.
सर्वसाधारण संस्था मतदार संघ-संजय माणिक जाधव (७७ )
गजानन धनसिंग पाटील (७४. )
धनराज देवराम महाजन ( ७७)
सुमनबाई गोविंदा पाटील ( ७०)
प्रकाश ओंकार महाजन. (७८)
पवन संजय सोनवणे (७३)
भगवंतराव नारायण पाटील (८१)
विजाभज व विमाप्र रवींद्र भिमसिंग जाधव (५४५. )
सर्वसाधारण व्यक्ती शहा मतदार संघ
रवींद्र बाबुराव चव्हाण (४८१)
ज्ञानेश्वर भादू महाजन (४६९)
विनोद निळकंठ पाटील (४२७)
इतर मागासवर्ग मतदार संघ
संभाजी शिवाजी चव्हाण (६१५)
अनुसूचित जाती जमाती
कल्पना गरीबदास अहिरे.(५७८)
या निवडणुकीसाठी खासदार उमेश पाटील नामदार गिरीश महाजन , आमदार चिमणराव पाटील आमदार राजू मामा भोळे, भाजपाचे सुभाष पाटील व पीसी पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गुलाबराव पाटील यांनी कामकाज पाहिले त्यांना शेतकी संघाचे व्यवस्थापक अरुण पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!