शहरला पाणी पुरवठा एक दिवस उशिराने होणार..

अमळनेर (प्रतिनिधि) सतत येणाऱ्या अडथळ्यांमुळे अमळनेर शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असून विलंब होत आहे. २२ रोजी विजेचा खांब पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शहराला होणारा पाणी पुरवठा एक दिवस उशिराने होणार असल्याचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी कळविले आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी मेहेरगाव येथे मुख्य पाइपलाईन जेसीबी मशीन ने फोडून टाकल्याने अमळनेर शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला होता.
तत्पूर्वी गांधली अमळगाव दरम्यान पाईपलाईन फुटली होती तेव्हाही पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. तर महिनाभरात पर्यावरणात बदल झाल्याने चार ते पाच वेळा वादळाने विद्युत पुरवठा खंडित झाला म्हणून पाणी पुरवठा करण्यास विलंब झाला होता.
आताही विद्युत खांब पडल्याने युद्धपातळीवर विजेचा खांब बसवणे सुरू आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी सरोदे यांनी केले आहे.