एरंडोल शहरात कोण होणार करोडपतीची प्रतियोगिता उत्साहात संपन्न.

एरंडोल (प्रतिनिधि) येथे पांडव वाड़ा प्रांगणात सोनी मराठी टि.व्ही. वरील कोण होणार करोडपती प्रतियोगिता संपन्न झाली. या प्रतियोगितेचे आयोजन ग्राहक कल्याण फौंडेशन अधक्ष्या आरती कुंदन सिंह ठाकुर यांनी केले होते.
सदर कार्यक्रम हा सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता २९ मे पासून शुरू होत आहे. त्या कार्यक्रमाच्या प्रमोशन साठी हा कार्यक्रम आयोजित केले होते. एरंडोल शहरात एकूण ३ विजेते ठरले.विजेत्यांना नॉनस्टिक डोसा तवे दिले.
यावेळी कार्यक्रमाला भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला.
सदर कार्यक्रम मध्ये, २ पुरूष व १ महिला विजेते झाले.याप्रसंगी आर.टी.काबरे विद्यालय चे शिक्षक अमोल वाणी , पत्रकार कुंदन सिंह ठाकुर तसेच बबीता पवार विजेते ठरले .
हा कार्यक्रम तालुक्यातील कासोदा येथे ही घेण्यात आला होता. सदर कार्यक्रमा चे आयोजन पत्रकार प्रमोद पाटील यांनी केले होते.सदर कार्यक्रम कासोदा येथील श्री राम मंदिर येथे घेण्यात आला होता. कार्यक्रम ला चांगला प्रतिसाद मिळाला.