अमळनेर येथे उपविभागीय पोलीस अधिकारीपदी सुनिल दिगंबर नांदवलकर..

अमळनेर(प्रतिनिधि) राज्याच्या गृह विभागाने सोमवारी रात्री उशिरा पोलिस उपअधीक्षक आणि सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. सुनील दिगंबर नांदवलकर यांची अमळनेर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. अतिशय शांत, संयमी आणि शिस्तप्रिय आहे यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत पुण्यातून उच्च शिक्षण घेतल्यानंतर १९९० मध्ये नक्षलग्रस्त गडचिरोली येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली. आत्तापर्यंत त्यांनी गडचिरोली, जळगाव, चोपडा, औरंगाबाद, नाशिक, पालघर, नंदुरबार अशा विविध उच्च पदांवर पोलीस खात्यात आपली छाप सोडली आहे. राज्यातील प्रसिद्ध तेलगी तपासातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.