चौघांची रिक्षा चालकास शिवीगाळ व मारहाण..

अमळनेर (प्रतिनिधि) रेल्वे स्टेशन वरून पॅसेंजर का बसवले या कारणावरून चौघांनी एक रिक्षा चालकाला प्रवेशद्वारावरच मारहाण केल्याची घटना २१ रोजी दुपारी दिड वाजता घडली.
लक्ष्मण प्रकाश पाटील रा गणेश कॉलनी, तांबेपुरा एम एच १८ एन ६७०० हिच्यावर २१ रोजी चार पॅसेंजर घेऊन स्टेशन वर गेला आणि दोन पॅसेंजर उतरवून प्रवेशद्वारावर गेला असता दीपक (पूर्ण नाव माहीत नाही ), पप्पू (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यासह अनोळखी दोघांनी त्याला मधून पॅसेंजर का बसवले असे सांगत शिवीगाळ व मारहाण केली. लक्ष्मण ला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलीस नाईक सुनील हटकर यांनी दवाखान्यात जाऊन जबाब घेतल्याने चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल बापू साळुंखे करीत आहेत