जळगाव जिल्ह्यातील नऊ अंमलदाराना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती..

अमळनेर( प्रतिनिधि ) जळगाव जिल्ह्यातील नऊ अंमलदाराना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे.

एसआय मंगला वेताळ पवार ,हेडकॉन्स्टेबल कल्याणी रवींद्र पाटील , एएसआय आनन्दसिंग धर्मा पाटील , हेडकॉन्स्टेबल प्रकाश त्र्यंबक हिवराये , एएसआय विलास अर्जुन पाटील , हेडकॉन्स्टेबल धर्मराज वसंतराव पाटील ,विजय देवराम पाटील , हेडकॉन्स्टेबल मनोज रमेश इन्द्रेकर , विनोद जालंधर शिंदे यांना विभागांतरंगत पदोन्नती मिळाली आहे. अप्पर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी निवडपात्र अंमलदाराना २५ टक्के कोट्यात रिक्त पदावर पदोन्नती दिली आहे. जिल्ह्यातील सर्व नऊ अमलदारांनी नाशिक विभाग निवडला आहे.