बांभोरी येथील अस्टेमो ब्रेक इंडिया प्रा. लि. च्या कर्मचाऱ्यांच्या संपात पालक मंत्री चे पुत्राची भेट…

धरणगांव ( प्रतिनिधी ) जळगांव जिल्ह्यातील पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री महोदय गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव जिल्हा

परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी घेतली संपावर बसलेल्या कामगारांची भेट
येत्या शुक्रवार पर्यंत कंपनीच्या प्रशासनाशी बोलून कामगारांच्या हिताचा निर्णय घेऊन संप मिटवून
असे आश्वासन प्रतापभाऊंनी यावेळी दिले.
बांभोरी हिताची अस्टेमो ब्रेक सिस्टम इंडिया प्रा.लि.
या कंपनीतील कामगार बेमुदत संपावर गेलेले आहेत. याठिकाणी प्रतापराव पाटील यांनी संपावर गेलेल्या कामगारांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अनिलशेठ नन्नवरे, ईश्वर शेठ नन्नवरे सरपंच सचिन बिऱ्हाडे, शांताराम महाराज, माजी सरपंच राकेश नन्नवरे आदी उपस्थित होते.