अमळनेर येथे पवित्र हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मेंदूज्वर लसीकरण चे आयोजन…

0

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर येथे पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या ९१ भाविकांनी मेदूज्वरची लस घेतली अमळनेर येथील मा नगरसेवक हाजी शेखा मिस्तरी, सामाजिक कार्यकर्ते राजु अलाउद्दीन शेख,मा नगरसेवक फिरोज मिस्तरी,व सना मुव्हिजचे संचालक सैय्यद मुख्तार अली यांच्या मार्गदर्शनाखाली पवित्र हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी

मेंदूज्वर लसीकरण शिबिर शहरातील कसाली मोहल्ला किल्ला चौक येथील अक्सा हाॅल मध्ये आयोजित करण्यात आले होते या शिबिरात अमळनेर, चोपडा, पारोळा, धरणगांव, शिरपूर येथील एकुण ९१ भाविकांनी लाभ घेतला पवित्र हज यात्रेसाठी जाण्यासाठी मेंदूज्वर ची लस घेणे बंधनकारक असते हे लस नाही घेतली तर सौदी अरेबिया येथील जद्दा विमानतळ प्रवेश नाकारण्यात येतो ही लस जिल्हास्तरावर असते परंतु मागील काही वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे यांच्या प्रयत्नाने अमळनेर येथे शिबिर आयोजित करण्यात येतो आणि आजूबाजूच्या परिसरातील भाविकांना सोयीचे होतो लसीकरण शिबिरात माजी आमदार साहेबराव पाटील, मा जि प सदस्य जयश्री ताई पाटील,सह आदिंनी भेट दिली डॉ ताडे, डॉ विलास महाजन,सह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळ देऊन अनमोल सहकार्य केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!