शिरपूर येथे २५ मे पासून राज्यस्तरीय वेस्टर्न इंडियन फुटबॉल स्पर्धेत अमळनेरचे चार खेळाडूनची निवड…

अमळनेर (प्रतिनिधी) राज्यस्तरीय वेस्टर्न इंडियन फुटबॉल आससोसिएशनतर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी अमळनेरच्या विद्यार्थ्यांचा प्रभाग क्र. 6 च्या नगरसेवक व नागरिकांतर्फे सत्कार करण्यात आला. वेस्टर्न इंडियन फुटबॉल असोसिएशनतर्फे

अंडर 14 राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या निवड चाचणीमध्ये जिल्ह्यातील 600 खेळाडूंमधून अमळनेरच्या 4 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे
विद्यार्थी आपल्या जिल्ह्यासाठी शिरपूर येथे दिनांक 25 मे पासुन सुरु होणाऱ्या स्पर्धेत खेळणार आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये अमळनेरच्या अल्तमाश सय्यद याची.. उपकर्णधारपदी निवड झाली असुन त्याच्या सह मोईन सय्यद, कुणाल लक्ष्मण देवकाते, फरहान शेख.उपकर्णधारपदी निवड झाली असुन त्याच्या सह मोईन सय्यद, कुणाल लक्ष्मण देवकाते, फरहान शेख. या मुलांची निवड झाल्या प्रित्यर्थ त्यांची प्रभाग क्र 6 चे नगरसेवक मनोज पाटील व प्रभागातील नागरिकांतर्फे सत्कार करुन कौतुक करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षपदी शौकतअली सय्यद तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक व काँग्रेस अध्यक्ष मनोज पाटील, सय्यद, मुक्तार मिस्त्री, नाना वसंत विसपुते, सागर कुंभार, जुबेर पठाण, जावेद अली सय्यद, मोईनउद्दीन शेख, रईस शेख, साबीर शेख, बिपीन लोहेरे, बाळु देवकाते, सलीम शेख, पप्पूभाई, यावेळी सत्कार प्रसंगी बोलतांना मनोज पाटलांनी खेळाडूंच कौतुक करतांना सर्व सामाजिक क्षेत्रातील व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन अशा कौशल्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी आवाहन केले. यावेळी या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे अर्शद साबीर शेख व वासिम रहीम शेख या दोघ कोचचे विशेष कौतुक केले. पुढील खेळाडू घडवण्यासाठी येथछो मदत करण्याचे आश्वासन दिले. अध्यक्षीय मनोगतात शौकतअली सय्यद विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी सूत्रसंचालन जावेद अली शौकत अली सय्यद यांनी केले. आभार मोइनउद्दीन शेख यांनी मानले. त्या वेळी प्रभागातील असंख्य नागरिक व तरुण युवक उपस्थित होते. य विद्यार्थ्यांचे परिसरसह सर्व तालुक्यात कौतुक होत