एरंडोल बस स्थानकात मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेतर्फे पाणपोईचा शुभारंभ..

एरंडोल (प्रतिनिधि) रखरखीत उन व वाढते तापमान अशी जिवाची लाहीलाही करणाऱ्या सध्याच्या स्थितिच्या पार्श्वभूमीवर मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेतर्फे येथील बस स्थानक आवारात मोफत पाणपोईचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी दशरथ महाजन,संदेश क्षीरसागर,प्राप्ती पारखे यांनी प्रवाशांना पाणी वाटण्याचा काही वेळ आनंद घेतला विशेष हे की या पाणपोईवर फिल्टर आरोचे थंडगार पाणी वाटप केले जाते
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक संदेश क्षीरसागर हे होते
मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विक्की खोकरे यांनी प्रास्ताविक केले.
विक्की खोकरे व अरुण साळी ,चेतन कोठारी यांनी हा प्रकल्प हाती घेतला आहे..
पाण्या पेक्षा मोठे पुण्य कोणते नाही असे प्रतिपादन आगार व्यवस्थापक संदेश क्षीरसागर यांनी केले
अरुण साळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन प्रा आर एस पाटील यांनी केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते फकिरा खोकरे,पशू संवर्धन अधिकारी प्राप्ती पारखे, पशुधन पर्वक्षक पल्लवी सपकाळे, संगीता जाधव, बस स्थानक प्रमुख गोविंदा बागुल प्रवाशी चालक व वाहक उपस्थित होते
मुन्ना देशपांडे,अशोक साळी सागर साळी, गौरव राजपूत, राहुल पवार विशाल, पाटील, सुनिल महाजन, विनोद महाजन आदींनी मोलाचे परिश्रम घेतले