एरंडोल येथील रविंद्र महाजन याने कराटे स्पर्धेत दुबई मध्ये मिळवले सुवर्ण पदक.

एरंडोल (प्रतिनिधि) एरंडोल येथील रविंद्र संतोष महाजन याने दुबई येथील अबुधाबी येथे संपन्न झालेल्या कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले.
दुबई येथील इंटर नॅशनल कराटे चॅम्पियनशीप दुबई विनर कराटे क्लब अबुधाबी तर्फे

येथील अलजझिरा क्लब प्राइड ऑफ अबुधाबी ही स्पर्धा दि.१८ मे ते २१ मे दरम्यान घेण्यात आली.यात एकुण ३० देश सहभागी झाले होते.याप्रसंगी रविंद्र महाजन याने ५७ किलो वजनी गटात साऊथ आफ्रिका,पाकिस्तान व जपान या देशातील खेळाडूंना पराभुत करत सुवर्ण पदक पटकावले.रविंद्र महाजन याला डी.जी.बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच तो सामाजिक कार्यकर्ते संतोष महाजन यांचा मुलगा आहे.
रविंद्र महाजन याचे सोहम स्पोर्ट्स अकॅडमी,चंदन गुरु व्यायाम शाळा यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला तसेच एरंडोल पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सतिष गोराडे,तहसिलदार सुचिता चव्हाण,एरंडोल महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील,प्राचार्य एन.ए.पाटील,प्रा.के.जे.वाघ,प्रा.आर.एस.पाटील,प्रा.एम.बी.वसईकर,माजी नायब तहसीलदार अरुण माळी,माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन,एरंडोल तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संजय महाजन तसेच महाराष्ट्रातून विविध स्तरातून कौतुक होत आहे.