विप्रो जलसंधारण प्रकल्पा अंतर्गत गांधली ता.अमळनेर येथे सुरुवात… भविष्यात ३०० एकर क्षेत्र सिंचनखाली येईल…

0

अमळनेर ( प्रतिनिधि ) विप्रो केयर व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जलसंधारण प्रकल्पाचे गांधली व पिळोदे येथे मोठ्या उत्साहात व आनंदाच्या वातावरणात जलसंधारणाच्या कामांना सुरुवात झाली. जलसंधारण प्रकल्प अंतर्गत सिमेंट बंधारे बांधकाम, नाखोलिकरण रुंदीकरण

व गाळ काढणे, गाव तलाव बांधकाम,क्षमता बांधणी इत्यादी कामे केले जाणार असुन या प्रोजेक्ट साठी.
विप्रो केयर सी.एस.आर निधीतून येणाऱ्या दोन वर्षात वरील जलसंधारणाचे काम करणार आहे. या प्रकल्पासाठी लागणारे सर्व तांत्रिक मार्गदर्शन व अंमलबजावणी मराठवाडा ग्रामीण विकास संस्था (MGVS), छत्रपती संभाजीनगर करणार असल्याचे प्रकल्प संचालक आप्पासाहेब उगले यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितले. हे काम पुर्ण झाल्यानंतर साधारण १८ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण होणार आहे. प्रकल्प २ वेळा भरल्यास ३६ कोटी लिटर पाणी जमिनीत मुरेल. या कामामुळे भूजल पातळी वाढल्याने भाविष्यात 300 एकर क्षेत्र सिंचनाखाली येईल. तसेच या कामात ग्रामस्थांकडून एकूण खर्चाच्या पाच टक्के लोकवर्गणीचा वाटा असेल. याप्रसंगी गांधलीचे सरपंच नरेंद्र पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गावकऱ्यांनी दिलेला पाठिंबा व ग्रामपंचायत सदस्यांचा असलेला पूर्ण विश्वास यामुळेच हे एवढे मोठे यश मिळाले असल्याचे त्यांनी व्यक्त केले. खोलीकरणाच्या कार्यास इथपर्यंत येण्यासाठी गांधलीकरांचे सातत्यपूर्ण पाठपुरावा व वेळोवेळी केलेले प्रेझेंटेशन अतिशय महत्त्वाचे होते असे श्री सुधीर बडगुजर यांनी विप्रोच्यावतीने मनोगत व्यक्त करताना सांगितले तसेच भविष्यात गावातील महिला बचत गटांसाठी भरीव कार्य करण्याचे सूतोवाच केले. तसेच यासंदर्भात चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रामकृष्ण महाजन सर यांनी केले आपल्या मनोगतात त्यांनी गांधली गावाचा इतिहास स्व. भाऊसाहेब के.एम पाटील यांच्यापासून चालत आलेली राजकीय व सामाजिक परंपरा या संदर्भात माहिती दिली. याप्रसंगी वीप्रो कंपनीचे श्री जितेंद्र शर्मा, आनंद निकम, चेतन थोरात, सुधीर बडगुजर, भावेश साळुंखे. मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे श्री आप्पासाहेब उगले, ओंकार उगले, आधार संस्थेच्या सौ. भारती पाटील BMM च्या सौ.सीमा रगडे, योगेश भामरे समन्वयक, उपसरपंच शिवदास पारधी,सौ. राजश्री महाजन, अशोक पाटील, राहुल बाविस्कर, तसेच धनंजय तात्या कुलकर्णी, प्रवीण आप्पा पाटील, गिरीश पाटील, किशोर पाटील, शामकांत पाटील, संजय पाटील, अशोक बाविस्कर,राकेश महाजन, रविंद्र देशमुख,नितीन चव्हाण, हेमकांत पाटील गांधलीचे पोलीस पाटील प्रताप संदानशिव ,महिला बचत गटाच्या सदस्या, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!