विद्रोही साहित्य संमेलन आयोजन समितीची अमळनेरला बैठक संपन्न..

अमळनेर ( प्रतिनिधि) अमळनेर येथे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्याच्या दृष्टीने नुकतीच प्राथमिक बैठक पार पडली. श्याम पाटील यांच्या फोर्स ढेकू रोड, अमळनेर येथील कार्यालयात ही बैठक झाली. कॉ. किशोर ढमाले व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी बैठकीस मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रा. गौतम निकम, एच. टी. माळी विचार मंचावर उपस्थित होते. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे संघटक किशोर ढमाले यांनी विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे महात्मा फुले यांनी मांडलेल्या विचारांवर आधारित असून, सर्व बहुजन महापुरुषांच्या वैचारिक व सांस्कृतिक आधारावर उभे असल्याचे सांगितले. धारावी येथे झालेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनापासून ते वर्धा येथे झालेल्या सतराव्या विद्रोही साहित्य संमेलनापर्यंतचा आढावा घेऊन हा आलेख सतत खात गेल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांनी प्रास्ताविक केले.