अविनाश गोविंद बागुल याची सीमा सुरक्षा दल मध्ये सैनिकपदी निवड..

एरंडोल ( प्रतिनिधी) कसोदा येथील अविनाश गोविंदा बागुल याचे आज रोजी भारतीय सुरक्षेच्या सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये सैनिक म्हणून निवड झाली आहे तालुक्यातून ओबीसी मधून ही एकमेव निवड आहे वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी निवड झालेल्या अविनाश ला या माध्यमातून देश सेवेसाठी संधी निर्माण झाली आहे अविनाश यांचे वडील गोविंदा बागुल हे सुद्धा आर्मी मधून सेवानिवृत्त झाले असून सध्या एस टी महमंडळाच्या एरंडोल आगारात स्थानक प्रमुख म्हणून कार्यरत आहेत या निवडी बद्दल अविनाश याची विभाग नियंत्रक भगवान जगनोर ,विभागीय वाहतूक अधिकारी बंजारा व एरंडोल आगारप्रमुख संदेश क्षिरसागर ,जळगाव आगारप्रमुख विजय पाटील यांचेसह एस टी कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.