धुळे वाहतूक शाखेतील ५५ वर्षावरील पोलीस अधिकारी व अमलदार यांना ह्मपायर कॅपचे वाटप..

धुळे (अनिस अहेमद) सद्या धुळे शहराचे तापमान हे ४१ ते ४२ अंश सेल्सीयस पावेतो असल्याने शहर वाहतुक शाखा. धुळे येथे नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार हे भर उन्हात वाहतुक नियमन डयुटी करीत असतात- तसेच पोलीस दलातील ५५ वर्षावरी

ल पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सधा सुरु असलेल्या कडक “उन्हामुळे त्यांना सावलीतील / कार्यालयातील डयूटया नेमणेबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी आदेशित केलेले आहे. सदरचे पोलीस अधिकारी व अमलदार यांना उन्हापासून त्रास होवू नये, यासाठी मा. पोलीस अधीक्षक, सो, धुळे श्री. संजय बारकुंड यांचे हस्ते शहर वाहतुक शाखा, धुळे येथील नेमणुकीचे ०४ पोलीस अधिकारी व ६१ पोलीस अंमलदार यांना हंम्पायर कॅपचे वाटप आज दिनांक २९/०५/२०२३ रोजी शहर वाहतूक शाखा, धुळे येथे संपन्न झाले. सदर वेळी मा. पोलीस अधीक्षक, सोो. धुळे यांनी शहर वाहतूक शाखेच्या पोलीस अंमलदार यांनी डयुटोचे वेळी पाण्याची बाटली, ग्लुकोज पावडर असे सोबत बाळगुण, शक्यतो सावलीत उभे राहुन वाहतूक नियमन करणे, व स्वतःच्या प्रकृतीचा देखील काळजी घेणेबाबत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाच्या वेळी श्री. हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक, स्वा.गु.शा. धुळे, मसपोनि संगिता राउत, पोउनि / संजय इनमुलवार, श्रेणी पोउनि हेमंत सोनार व शहर वाहतुक शाखेतील पुरुष व महिला पोलीस अंमलदार उपस्थित होते.