ज्येष्ठ नागरिकांचा धरणे आंदोलनाचा इशारा…

अमळनेर (प्रतिनिधि) जेष्ठ नागरिकांसाठी बांधण्यात आलेले सभागृह आणि खुला भूखंड सर्व सुविधांसह जेष्ठ नागरिक मंडळाच्या ताब्यात देण्यात यावे अन्यथा १५ पासून धरणे आंदोलनाला बसण्याचा इशारा मंडळाने निवेदनाद्वारे मुख्याधिकारीना दिला

आहे.
नगरपालिकेने पू सानेगुरुजी जेष्ट नागरिक मंडळास नगरपरिषदेने रामबाग कॉलनीत सभागृह व खुला भूखंड दिला आहे. मात्र इमारतीत शौचालय ,बाथरूम , विद्युत व्यवस्था , पिण्याच्या पाण्यासाठी नळ कनेक्शन नाही , मुख्य प्रवेशद्वाराला लोखंडी गेट बसवलेले नाही, जेष्ठांना बसायला खुर्च्या नाहीत आदी सुविधा अपूर्ण आहेत. तरी पालिकेने सर्व सुविधा पूर्ण करून त्याचा ताबा मंडळास द्यावा अन्यथा १५ जून पासून धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रशांत सरोदे , उपविभागीय अधिकारी कैलास कडलग ,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील ,सचिव एस एम पाटील , उपाध्यक्ष उमाकांत नाईक , कोषाध्यक्ष शालीग्राम पाटील , राजेंद्र नवसारीकर, जेष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील हजर होते.