महिला बसवाहकाची प्रवाशांसोबत अरेरावी.. निवृत्त पीएसआयची परिवहन मंत्र्यांकडे तक्रार…

अमळनेर येथील आगारातील महिला वाहकाने प्रवासी असलेल्या निवृत्त पोलिस

ऊपनिरीक्षक यांच्याशी अरेरावी केल्याप्रकरणी परिवहन मंत्र्यांकडे महिला वाहकाची तक्रार करण्यात आली आहे.
अमळनेर आगाराची अमळनेर ते डांगरी प्र.अ. या बसमधील
महिला वाहकाबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे.
वाहक या बसूनच तिकीट देत असताना वाहकाने प्रवाशांजवळ जाऊन तिकीट काढावे, त्या बस मधील प्रवासी असलेल्या निवृत्त पोलिस निरीक्षक राजाराम शिसोदे यानी सुचविले.
याचा राग आल्याने वाहकाने शिसोदे यांना अरेरावीची भाषा वापरली तसेच तुमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन, असे धमकावले. त्यामुळे मानसिक त्रास झाल्याचे शिसोदे यांनी तक्रारीत म्हटले..
.