वीज बिल भरूनही पुढच्या महिन्यात वीजबिल आल्याने ग्राहक समभ्रमात…

0

अमळनेर (प्रतिनिधि) वीज बिलावरील क्यू आर कोड स्कॅन करून वीज बिल भरल्यावरही ग्राहकांना पुढच्या महिन्यात वीज बिल आल्याने ग्राहक संभ्रमात पडले असून वीज मंडळ कार्यालयात गर्दी पडत असून अधिकाऱ्यांना जाब विचारला जात आहे.
शासनाने रोख रकमेने बिल भरणा कमी करून ग्राहकांना जास्तीत जास्त ऑनलाईन भरणा करण्याकडे वळवले आहे. वीज बिल वसुली बाबत खाजगी

गी कंपनीला ठेका देण्यात आला आहे. इतर ठिकाणी असलेली खाजगी वीज बिल वसुली केंद्रे बंद करण्यात आली आहेत. फक्त वीज कार्यालयात एकच बिल संकलन केंद्र असल्याने तेथे गर्दी पडते आणि वेळेचा अपव्यय होतो. परिणामी ग्राहक देखील आता फोन पे ,गुगल पे अथवा वीज बिलावरील क्यू आर कोड स्कॅन करून बिल भरणा करत आहेत. ग्रामीण भागात मात्र अजूनही ग्राहकांकडे लाईन मन किंवा वायरमन जाऊन स्वतः रक्कम गोळा करीत असल्याने ग्राहकांना जोपर्यंत वायरमन मागायला येत नाही तोपर्यंत बिल भरणा करण्याची सवय नाही. अमळनेर तालुक्यात सर्वाधिक ५० टक्के ग्राहक म्हणजे सुमारे अडीच कोटी रुपये वीजबिल ऑनलाईन भरणा करीत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून वीज बिलावरील क्यू आर कोड कुचकामी ठरला आहे. क्यू आर कोड स्कॅन करून वीज बिल भरल्यावरही थकबाकी येत असल्याने ग्राहक गोंधळात पडले. आपली भरलेली रक्कम बुडाली की काय म्हणून ग्राहक उपविभागीय अभियंता प्रशांत ठाकरे व अभियंता विनोद देशमुख यांच्या दालनात जाऊन जाब विचारत आहेत.
ज्या कंपनीला ठेका दिला आहे त्यांनी तयार केलेला क्यू आर कोड तांत्रिक अडचणींमुळे ग्राहकांकडून वसुली झाली आहे परंतु वीज मंडळाकडे ती भरली गेली नसल्याने वीज मंडळाने थकबाकी म्हणून पुन्हा बिले पाठवली आहेत.
मंडळाने वेळेची बचत करून ड्यु डेट पूर्वी बिल भरणासाठी क्यू आर कोड दिल्याने तेथे बिल भरले मात्र बाकी आल्याने पुन्हा कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.- आय एच एफ हसन बोहरी ,ग्राहक अमळनेर
जो वीज बिल नीट न्याहाळून बघेल त्यालाच समजेल काही ग्राहक आलेले बिल तसेच भरत आहेत त्यामुळे डबल बिल भरणा देखील होत आहे. याबाबत मंडळानेच तपासून ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी.- मधुकर पंढरीनाथ शिवपूजे ,ग्राहक ,अमळनेर
संबंधित कंपनी कडून तांत्रिक दुरुस्ती केली जात असून ग्राहकांच्या नावावर भरलेली रक्कम जमा होणार आहे. डबल भरली गेल्यास त्यांच्या नावावर किंवा खात्यावर ती रक्कम जमा होईल. आता ग्राहकांना भरलेली रक्कम सवलत देऊन वीज बिल स्वीकारण्यास मंजुरी देत आहोत. – प्रशांत ठाकरे ,उपविभागीय अभियंता ,वीज मंडळ अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!