राज-फडणवीस भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण..

..
24 प्राईम न्यूज 31 May 2023
राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे मनसे-भाजप युतीच्या चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू झाल्या आहेत. मात्र, फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम देत ही भेट अराजकीय गप्पा मारण्यासाठी झाल्याचे सांगितले.
फडणवीस यांनी सोमवारी रात्री ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. जवळपास दीड तासाहून अधिक वेळ चालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चाही सुरू झाली आहे. मात्र या चर्चेला पूर्णविराम देत फडणवीस यांनी या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. ‘अराजकीय गप्पा मारण्यासाठी शिवतीर्थवर गेलो होतो. बऱ्याच दिवसांपासून आमचे ठरले होते, सोमवारी मुहूर्त निघाला. असे ठरले होते की राजकीय विषय वगळून गप्पा मारायच्या’, असे त्यांनी नमूद केले.