अमळनेरमध्ये २ जणांनी गळफास घेऊन केली आत्महत्या..

अमळनेर ( प्रतिनिधि ) अमळनेर तालुक्यातील भिलाली आणि ताडेपुरा येथे दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 31 मे रोजी उघडकीस आली. टॅक्सीचालक राकेश चंद्रकांत सातपुते (वय 35, रा. ताडेपुरा) यांनी 31 रोजी सकाळी 1.30 वाजेच्या

सुमारास घराच्या छताच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून आत्महत्या केली. भावाने अमळनेर पोलिसांना माहिती देऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत. तर भिलाली येथील गुलाब धनसिंग गिरासे (४७) हा दोन्ही पायांनी अपंग असलेला व्यक्ती कामासाठी पूर्णपणे पत्नीवर अवलंबून होता. आयुष्याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी ३१ मे रोजी सकाळी साडेसहा वाजता बाभळीच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत इंद्रसिंग गिरासे यांनी मारवाड पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील करीत आहेत.