विप्रो ऑक्सिजन पार्क’ प्रकल्पांतर्गत गांधली येथे दहा हजार वृक्ष लागवडीचा कार्यास सुरुवात..

अमळनेर ( प्रतिनिधि) पर्यावरण दिनाच्या पूर्व संधेस विप्रो कन्झुमर केअर-अमळनेर, आधार संस्था-अमळनेर व गांधली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त प्रयत्नातून गांधली येथे विप्रो ऑक्सिजन पार्क प्रकल्पांतर्गत मियावाकी पद्धतीने स्थानिक वृक्षांची निवड करून सघ

न पद्धतीतून लागवड करण्यात आली. पहिल्या टप्प्यात पाच हजार वृक्ष लागवड यशस्वीपणे करण्यात आली असुन, उर्वरित पाच हजार वृक्ष जुलै मध्ये करण्यात येणार आहेत. तरी पुढील टप्प्यात तालुक्यातील शैक्षणिक संस्था, पर्यावरण प्रेमी संस्था तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी सक्रियपणे सहभाग घ्यावा असे आवाहन आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ.भारतीताई पाटील सौ.रेणू प्रसाद यांनी केले.
तसेच विप्रो मार्फत मनोगत व्यक्त करताना श्री सुधीर बडगुजर साहेब यांनी हा प्रकल्प यशस्वी झाल्यास उत्तर महाराष्ट्रातील हा एक पथदर्शी प्रकल्प होणार असून, भविष्यात या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांसाठी हा landmark ठरणार असल्याचे सांगितले. उत्तर महाराष्ट्रातील हा कदाचित एवढा मोठा पहिलाच प्रयोग असल्याचा उल्लेख केला. वर्षभरापासून गांधलीचे सरपंच नरेंद्र पाटील व ग्रापंचायत सदस्यांनी मियावाकी प्रकल्पा संदर्भात वेळोवेळी केलेले प्रेझेंटेशन, गावातील पाणी संस्था मार्फत काम करणारे कार्यकर्ते यांनी केलेला पाठपुरावा यामुळे या चांगला व अनोखा प्रकल्प मार्गी लागत असल्याचे सांगितले.
यात दोन एकर क्षेत्रात तारांचे कुंपण करून, शास्वत पाण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. पुढील पाच वर्षासाठी चे व्यवस्थापन, लागणारे मनुष्यबळ अथवा खर्च (कुंपणासहीत) विप्रो कंपनी अमळनेर करणार आहे. तांत्रिक सल्ला व मार्गदर्शन आधार संस्था तसेच स्थानिक व्यवस्थापन व संरक्षण ग्रामस्थ गांधली व ग्रामपंचायत करणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी अशा पद्धतीने सामाजिक संस्थांच्या कार्यात ग्रामस्थ, तसेच बाहेरगावी गेलेले गांधलीकर सक्रियपणे सहभाग घेतील असे श्री किशोर पाटील सर, शामकांत पाटील सर, रामकृष्ण महाजन सर यांनी जाहीर केले. तसेच टीम पाणी फाउंडेशन गांधलीच्या वतीने नितीन चव्हाण व गिरीश पाटील यांनी ग्रामस्थांचा सहभाग असाच कायम ठेवण्याचा संकल्प जाहीर केला.
सामाजिक वनीकरणाच्या सहकार्याने 18000 वृक्षांची लागवड झालेली असून, आता विप्रो अमळनेर व आधार संस्थांचे सहकार्याने दहा हजार (10000) वृक्ष लागवड लागवड करण्यात येईल. एकूण 28 हजार वृक्ष लागवड ऑगस्ट महिना अखेर पूर्ण करून ग्रामपंचायत पुढील वर्षभरात अजून ५००० वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करीत आहे. गांधलीची लोकसंख्या तीन हजार असल्यामुळे एक व्यक्ती दहा झाड या संकल्पनेतून 33 हजार वृक्ष लागवड करण्याचे नियोजन व संकल्प ग्रामपंचायत,टीम पाणी फाउंडेशन गांधली व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने करणार असल्याचे सरपंच नरेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास श्री.विजय भाजीवाला अमळनेर प्लांट इन्चार्ज, चेतन थोरात एच आर मॅनेजर सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक श्री प्रमोद पाटील, प्रवीण पाटील, संजय पाटील, सौ. रेणुप्रसाद कार्यकारी संचालक, हेमंत पाटील प्रकल्प समन्वयक, बचत गटाच्या सदस्या व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.