धुळे शहरातील अवैध रित्या गुंगीकारक औषधी बाटल्यांची विक्री करणारा आरोपी जेलबंद चाळीसगांव रोड पोलीस स्टेशनची कारवाई..

0

धुळे (अनिस अहेमद) धुळे शहरातील चाळीसगांव रोड पोस्टे हददीत शब्बीर नगर परीसरात दोन हजार वस्ती येथे सार्व जागी अकबर अली कैसर अली शेख हा त्याचे कब्जात गुंगीकारक औषधी बाटल्यां

ची चोरटी विक्री करीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोनि प्रमोद पाटील सो यांनी लागलीच पोसई विनोद पवार, पोसई संदीप ठाकरे यांना छाप्याची तयारी करणे कामी आदेशित केल्याने चाळीसगांव रोड पोस्टेचे पोलीस अंमलदारासंह धुळे शहरातील शब्बीर नगर परीसरातील 2000 वस्ती येथील सार्व रोडावर जावून खात्री केली असता त्याठिकाणी लागलीच एक इसम दोन खोके जवळ बाळगुन औषधी बाटल्यांची विक्री करतांना मिळुन आल्याने चाळीसगांव रोड पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने इसमांस मुददेमालासह जागीच पकडले असता त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव अकबर अली कैसर अली शेख वय 34 रा. शब्बीर नगर धुळे असे सांगुन त्यास ताब्यात घेतले आहे.

वरील प्रमाणे कारवाईत पोलीसांनी 28.300/- रुपये किंमतीचा एकुण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यात 140 रु प्रमाणे प्रत्येकी 100 मिली मापाच्या ACTIVE नावाचे निळे झाकण असलेल्या सिलबंद एकुण 195 बाटल्या प्रत्येक बाटलीवर Codeine phosphate Chloropheniramine Maleate and Sodium Cirtate Cough Linctus या नावाचे गुंगीकारक औषधी बाटल्या व आरोपीताच्या अंगझडतीत मिळुन आलेले 1000/- रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन • पोकी/1501 पंकज ज्ञानोबा शिंदे यांनी दिलेल्या लेखी फिर्याद वरुन वरील इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक संजय बारकुंड सो, अप्पर पोलीस अधिक्षक किशोळ काळे सो, सहा. पोलीस अधिक्षक सो. ऋषीकेश रेड्डी सो धुळे शहर विभाग धुळे, पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील स्था.गु.शा. धुळे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोनि / प्रमोद पाटील, पोउपनि विनोद पवार, पोउपनि संदीप ठाकरे, पोहेकॉ 1242, पंकज नरेंद्र चव्हाण, पोहेकॉ/1120 रविंद्र ठाकुर, पोहेकॉ / 416, संदिप जगन्नाथ पाटील, पोकॉ/29 चेतन झोळेकर, पोकों/ 1180, स्वप्नील सोनवणे, पोकों/1501 पंकज शिंदे, पोकॉ/742 संदीप वाघ, पोशि/ 1262 इमरान शेख, पोकॉ / 380 विशाल गायकवाड, पोकों/ 1480 देवेंद्र तायडे, पोकॉ/ 1686 शरद जाधव पोकों/512 सोमनाथ चौरे तसेच शासकीय वाहन चालक पोना / 14 कुलदीप महाजन अशांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!