जींगर गल्ली पानखिडकी भागात दोन गटात दगडफेक..

अमळनेर (प्रतिनिधि)
जिंगर गल्ली पांनखिडकी भागात शुक्रवारी रात्री दोन गटांत हाणामारी होऊन तुफान दगडफेक झाली.
सराफ बाजार परिसर व्यापाऱ्यांचा असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राकेशसिंग परदेशी, पोलिस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले, लहान मुलांच्या भांडणातून वाद वाढत त्याचे दगडफेकीत रूपांतर झाल्याचे समजते पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले. पोलिस दंगलीमागील संशयितांचा शोध घेत आहेत.पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांततेचे आवाहन केले आहे.