नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील अमळनेरात. जनतेशी संवाद साधनार..

अमळनेर (प्रतिनिधि)शहरातील दंगलीच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील हे २२ रोजी दुपारी १ वाजता शांतता समितीची बैठक घेऊन जनतेशी संवाद साधणार आहेत.
अमळनेर शहरात झालेली दगडफेक ,पोलिसांवर झालेला हल्ला , न्यायालयीन कोठडीत अशपाक चा मृत्यू आणि पोलिसांवर झालेले आरोप आदींमुळे झालेले समज ,गैरसमज यावर प्रकाश टाकण्यासाठी ,जनतेचे विचार मनोगत ऐकून मार्गदर्शन करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक अमळनेरात येत आहेत. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था नीट राहण्यासाठी प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व स्तरातील नागरिकांनी २२ रोजी दुपारी १ वाजता शांतता समितीच्या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांनी केले आहे.