आम्हाला जळणारे अमळनेर पहायचे नाही अमळनेरकरांच्या चेहऱ्यावर हास्य पहायचे आहे. असे प्रतिपादन नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी केले..

अमळनेर ( प्रतिनिधि )प्रत्येक सोशल मिडियावर आमची नजर आहे, व्हाट्सअप ग्रुपवर गोपनीय पोलीस काम करत आहे आणि सायबर यंत्रणा सतर्क आहे असा गंभीर इशारा नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी अमळनेर येथील शांतता समितीच्या बैठकीत दिला.

ज्या ज्या ठिकाणी दंगली झाल्या त्या शहराचा विकास झाला नाही. पालकांनी आपली मुले रात्री कुठे जातात? काय करतात? याकडे लक्ष दिले पाहिजे. चुकीच्या घटना घडू नये म्हणून आता रात्री ११ वाजेनंतरचे निर्बंध केले जातील. तरुणावर असलेला एक गुन्हा त्याचे पुढील आयुष्य बरबाद करून टाकतो. बॉर्डरवर सैनिक, अधिकारी उभा असतो त्याला देशाच्या सुरक्षेची काळजी असते तर इथे रस्त्यावर वर्दीतला पोलीस उभा अस

तो त्याला अंतर्गत सुरक्षेची काळजी असते. देशाची अंतर्गत सुरक्षा चांगली असेल तरच देशाचा विकास होऊ शकतो. ‘देशाची सुरक्षा, आपली सचोटी, एक कॅमेरा पोलिसांसाठी…! हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. आम्हाला जळणारे अमळनेर पहायचे नाही अमळनेरकरांच्या चेहऱ्यावर हास्य पहायचे आहे. असे प्रतिपादन नासिक परीक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक बि. जि. शेखर पाटील यांनी केले. अमळनेर येथे दि ९जून ला दंगल झाली होती त्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहर धार्मिक व जातिय सलोखा शांतता समितीच्या बैठकी प्रसंगी ते बोलत होते अधीक्षक एम राजकुमार म्हणाले की, लोक विशिष्ट सण आले की विशिष्ट रंगात • रममाण होतात. फलक झेंडे लावणाऱ्यांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. चुकीचे काम करणार्यांना हटकण्याची समाजाची जबाबदारी आहे. दंगलीतील निरपराधांची नावे १०० टक्के कमी होतील. असे आश्वासन देखील राजकुमार यांनी दिले. आमदार अनिल पाटील म्हणाले की दंगल मिटवायला पुढे येणाऱ्या पदाधिकारी नावे दंगलखोर म्हणून पुढे येतात. म्हणून आता लोकप्रतिनिधी समाजसेवक पुढे येत नाहीत. निरपराध लोकांना सोडा म्हणजे शांतता समितीची बैठक सफल होईल. पोलिसांची कर्तव्याची जबाबदारी आहे शांततेची जबाबदारी समाजाची आहे. माजी आमदार डॉ बी एस पाटील म्हणाले की दंगल नियंत्रणासाठी समाजसेवक पुढे आले पाहिजे, यापुढे मी स्वतः पुढे येईल. माजी आमदार स्मिता वाघ म्हणाल्या की पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षण केले आहे. अनेकांच्या घरावर दगड, काठ्या आढळले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावळे, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, डीवायएसपी सुनील नंदवाळकर, एलसीबी पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, निवासी नायब तहसीलदार अमोल पाटील, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलीस निरीक्षक विजय शिंदे हजर होते.