समान नागरी कायद्याच्या विरोधात राष्ट्रीय आदिवासी परिषद चा एल्गार..

जळगाव ( प्रतिनिधि)
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर 11 ते 12 वाजेच्या दरमियान समान नागरी कायद्याला विरोध करीत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद निदर्शने केली व राष्ट्रपती महोदयांना जिल्हाधिकारी जळगावच्या माध्यमातून 3 पानी निवेदन दिले व त्यात मागणी केली की विधी आयोगाने समान नागरी कायद्याबाबत ज्या सूचना मागवल्या त्या सूचनांच्या आधारे भारत सरकार समान नागरी कायदा लावण्याच्या विचारात असल्याचे दिसून येते यामुळे भारतात राहणारे आदिवासी समाजाचा फार मोठ्या प्रमाणात नुकसान होईल व घटनेतील अनुच्छेद २४४ अनुसूची ५ व ६ चे उल्लंघन होईल.
तसेच भारतातील अल्पसंख्यांक समाज खास करून मुस्लिम, ईसाई, शिख यांचा सुद्धा घटनेतील कलम १४ व २५ प्रमाणे धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जाईल म्हणून समान नागरी कायदा लावण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली.
निदर्शनात यांचा होता सहभाग
राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे अध्यक्ष गफूर तडवी, परिषदेचे सदस्य जाकीर तडवी, अफजल तडवी ,मुस्तफा तडवी, खुमान सिंग बारेला, महाराष्ट्र राज्य बहुजन क्रांती मोर्चा चे सुमित्र अहिरे ,जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, शिकलगार फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे डॉक्टर शाकीर शेख व मुस्ताक शेख कम्युनिस्ट पक्षाचे अकील खान व मंजूर पटेल व आर बी परदेशी यांची उपस्थिती होती.
सदर मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभागाचे डेप्युटी चिटणीस प्रदीप झामरे यांना शिष्टमंडळाने दिले..