स्वातंत्र सेनानी शाहिद टिपू सुलतान चौक फलक पूर्नस्थापित करावे… -अल्पसंख्याक विकास व हक्क फाउंडेशन तर्फे निवेदन..

नंदुरबार(प्रतिनिधि)अल्पसंख्याक विकास हक्क फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आरिफ शेख यांनी संघटने चे राष्ट्रीय नेते मजी कैबिनेट मंत्री मो.आरिफ (नसीम) खान साहब यांच्या शी र्चचा करून नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की भारताचे स्वातंत्र्य सेनानी मिसाईल मॅन रॉकेट चे जनक महिलांचे रक्षक भारतीय संविधानात व नासा सारख्या उच्च संस्थेत ज्यांच्या फोटो आहे ज्यांनी सर्वप्रथम ब्रिटिशां विरुद्ध लढा दिला असे थोर स्वतंत्र सेनानी शहीद टिपू सुलतान यांच्या नावाने नंदुरबार शहरातील बागवान गल्ली पारशी च्या चक्की जवळील शहीद टिपू सुलतान चौक असे नामांकरण करण्याच्या ठराव क्रमांक 74 दिनांक 19/08 2014 रोजी च्या सभेत नंदुरबार नगरपरिषद ने ठराव पारित करून त्यामुळे त्वरित अंबलबजावणी होऊन या चौकात सर्व जातीय बांधवां समक्ष शहीद टिपू सुलतान चौक फलक नामांकन करण्यात आलेले आहे
मात्र काही मोजक्या लोकांनी सदर फलक काढण्यासंबंधी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी साहेब नंदुरबार यांना निवेदन देऊन सदर फलक हटवण्याची मागणी केली होती त्यानंतर मा. एजाज बागवान (अध्यक्ष सदा जनसेवा फाउंडेशन) यांनी फलक अधिकृत असल्याबाबत सविस्तर निवेदन मा. जिल्हाधिकारी सो नंदुरबार यांना त्वरित सादर केलेले आहे मात्र प्रशासनाने कुठल्याही समाजाला विश्वासात न घेता हो कुठलीच सूचना न देता रात्री तीन वाजेच्या दरम्यान दिनांक 06/072023 अचानकपणे फलक काढल्याने आमच्या भावना दुखावले आहे व नंदुरबार शहरातील जनतेच्या भावनांना लक्षात घेऊन धर्मनिरपेक्ष स्वातंत्र सेनानी शाहिद टिपू सुलतान चौक फलक पूर्नस्थापित करावे अशी मागणी केली आहे..