तांबापुरातील ती घटना नैसर्गिक नव्हे तर मानवनिर्मित आपत्ती- शासन, मनपा व न्हाई ने नुकसान भरपाई द्यावी मागणी..

जळगाव(प्रतिनिधि)
जळगाव शहरात गुरुवारी झालेल्या अल्पशा पावसामुळे तांबापुरातील पाच गल्ल्यामधील सुमारे १२५ कुटुंबियांच्या घरात तीन ते चार फूट पाणी साचल्याने त्यांना जो मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास व नुकसान झाले त्यास सर्वस्वी जळगाव शहर महानगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथील अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याने यास नैसर्गिक आपत्ती न बोलता मानवनिर्मिती आपत्ती असल्याने शासन, मनपा व महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून प्रत्येकी ५० हजार रुपये नुकसान भरपाई वसूल करून झोपडीधारकांना द्यावी अशी एक मुखी मागणी एका शिष्टमंडळाने जिल्हा अधिकारी यांच्याकडे केली.
मानव निर्मिती चुका
सदोबा वेअर हाऊस व सिद्धिविनायक हॉस्पिटल यामध्ये १.५ मीटर चे फक्त दोन पाईप टाकून पाणीचा निचरा केला आहे तो नियमानुसार नाही त्या ठिकाणी मोरी अथवा कन्वर्ट बांधणे आवश्यक होते.
२) सदोबा वेअर हाऊस समोर नैसर्गिक पाण्याचा प्रवाह होता तो थांबून
वळवण्यात आला ही गंभीर बाब आहे
३) डी मार्ट ते इच्छा देवी चौक या रस्त्यातील दोन्ही बाजूला गटारी असून सुद्धा युनिक सेल्स या दुकाना जवळ पाण्याचा प्रवाह बंद करून तो रस्त्या खालून पाईप द्वारे शहीद अब्दुल हमीद चौकात वळवीण्यात आला आहे
४) महामार्गा च्या खालील बाजूने जात असलेल्या नाल्या ची व त्यातील पाइपाची सफाई केली गेली नाही.
मागण्या
या चार मानवनिर्मित चुकामुळे ही आपत्ती झाली आहे त्यामुळे यास मानवी निष्काळजीपणा व चुकीला कोण जबाबदार आहे याची चौकशी

होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, मानवनिर्मित चुका दुरुस्त करून भविष्यात असा प्रकार घडता कामा नये अन्यथा जीवित हानी झाल्यास संबंधित मनपा व राष्ट्रीय महामार्ग च्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर सदोष मनुषयवधाचा गुन्हा दाखल करावा व नुकसान झालेल्या १२५ कुटुंबीयांना शासनातर्फे तसेच महानगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून प्रत्येकी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
या शिष्टमंडळात यांचा होता सहभाग
फारुक शेख अध्यक्ष जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी यांच्या नेतृत्वात इमदाद फाउंडेशनचे मतीन पटेल, तांबापुर येथील वसीम शेख ,इशा शेख , अरशद शेख, अमजद खान आसिफ शाह, राष्ट्रवादी अल्पसंख्यांचे अध्यक्ष मजहर पठाण, सामाजिक कार्यकर्ते पराग कोचुरे, कुमारी धारा ठक्कर, व सरला सैंदाणे तसेच फैजान शेख, हाशिम शेख, रजा मिर्झा आदींचा समावेश होता.
या निवेदनाच्या प्रती जिल्हा दंडाधिकारी यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री, महापौर व आयुक्त जळगाव शहर मनपा, संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पोलिस अधीक्षक जळगाव यांना देण्यात आल्या.