तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांत एकाचा साप चावल्याने तर दुसऱ्याचा विहिरीत तोल जाऊन पडल्याने मृत्यू..

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील निलेश युवराज पाटील वय १५ याला ९ रोजी सायंकाळी ७ वाजता रवींद्र देविदास पाटील यांच्या घराबाहेर पायाच्या बोटाला साप चावला त्याला तातडीने उपचारासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अमळनेर पोलीस स्टेशनला चुडामन पाटील यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहेत.
तर तालुक्यातील गडखाम्ब येथील पंकज पाटील व विश्वासराव पाटील हे गडखांब शिवरातील त्यांच्या गट नंबर २११/ १ च्या शेतातील विहिरीच्या पाईप ची जोडणी करत असताना मांजर्डी येथील सोनू अशोकगीर गोसावी वय २३ हा मतिमंद तरुण १० रोजी दुपारी ३:४५ वाजता तिकडून आला आणि विहिरीतील पाईप पकडायला गेला असता त्याचा तोल जाऊन विहिरीत पडून मृत्यू झाला. देविदास प्रभाकर पाटील याने कमरेला दोर बांधून सोनू चे प्रेत बाहेर काढले.अमळनेर पोलीस स्टेशनला पंकज च्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.