कांग्रेस चे डॉ.अनिल शिंदे यांनी घेतली शरद पवार यांची भेट, अमळनेर दौऱ्या साठी आमंत्रण..

अमळनेर (प्रतिनिधि) शरद पवार यांनी अमळनेरचा दौरा करावा, यासाठी आपण आमंत्रण दिले आहे, अशी माहिती काँग्रेसचे डॉ. अनिल शिंदे यांनी दिली. शरद पवार व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची नुकतीच शिंदे यांनी भेट घेतली.
अमळनेर विधानसभा मतदारसंघ यापूर्वी काँग्रेसकडे होता. मात्र, मध्यंतरी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नव्हता म्हणून राष्ट्रवादीला उमेदवारी देण्यात आली होती.
आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. आमदार अनिल पाटील हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नसतील, त्यामुळे आपणास संधी मिळावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.
त्यावर पवार यांनी आधी लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्यासाठी जोमाने कामाला लागा आणि यश मिळवा. त्यांनतर विधानसभेचा विचार करू, असे सांगितल्याचे ते म्हणाले.