अमळनेरात वाळू माफियांवर प्रशासनाची कडक कारवाई, -जमिनी सरकार जमा होणार.

अमळनेर( प्रतिनिधि)अमळनेर येथील ग स हायस्कूल मध्ये जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सर्व शासकीय विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस 48 विभागाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, डी वाय एस पी सुनील नंदवाळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एस एस वारूळे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, वनअधिकारी एस बी देसले, तालुका कृषी अधिकारी सी जे ठाकरे, मारवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांच्यासह महिला बालकल्याण अधिकारी, भूमी अभिलेख निरीक्षक, दुय्यम निबंधक विविध विभागाचे अधिकारी हजर होते.अमळनेर अवैध गौण खनिज वाहतूक करताना जप्त वाहनांचा दंड न भरणाऱ्या सात जणांच्या जमिनी सरकारजमा करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली.ज्यांच्या जमिनी सरकारजमा करण्यात आल्या आहेत, त्यात नईमखान सलीमखान (रा. कळमसरे), दिनेश कैलास पाटील (रा. टाकरखेडा), योगेश गुलाबराव पाटील (रा. कन्हेरे, नागो वामन कोळी (रा. जळोद), ज्ञानेश्वर प्रकाश कोळी (रा. मांडळ), जमालोद्दीन जहिरोद्दीन बेलदार (अमळनेर) आणि विलास राजाराम बेलदार (रा. प्रगणे डांगरी) यांचा समावेश आहे. या सातही जणांच्या शेतीवर सरकारचे नाव लावून सरकार जमा करण्यात आल्या आहेत. यानंतरही त्यांना दंड भरण्यासाठी सवलत देण्यात येणार आहे, अन्यथा शेतजमिनीचा लिलाव करून शासकीय दंड वसूल केला जाईल, असे महसूल प्रशासनातर्फे सांगण्यात आले.