धुळ्यात अल्पसंख्याक विभागाचे नगरसेवक शरद पवारांसोबतच : मा. आ. गोटेंना दिले हमीपत्र

धुळे (प्रतिनिधि)धुळे महानगरपालिकेतील एकूण ८ नगरसेवकां पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ५ व काँग्रेस पक्षाचे श्री शब्बीर भाई असे अल्पसंख्यांक विभागातील सहा नगरसेवक यांनी माननीय श्री शरचंद्रजी पवार साहेबां सोबत आहेत. आज सर्व नगरसेवकांनी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व धुळे नंदुरबार प्रभारी श्री अनिल अण्णा गोटे साहेब यांची धुळे पक्ष कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन आपण पवार साहेबां सोबतच असल्याची प्रतिज्ञापत्र सर्व सन्माननीय नगरसेवक- अब्दुल लतीफ अब्दुल हमीद, मुख्तार कासिम मंसूरी, वसीम बारी खलील अन्सारी, अन्सारी उमेर मोहम्मद शव्वाल, वसीम खान बिस्मिल्ला खान, शब्बीर शमशेर पिंजारी यांनी श्री अनिल अण्णा गोटे साहेब यांना सुपूर्द केले. यावेळी अल्पसंख्यांक ग्रामीण आघाडीचे अध्यक्ष श्री सलीम भाई शेख कार्यालय प्रमुख श्री अकबर आली सय्यद सर जावेद किराणा, इरफान अली व अल्पसंख्यांक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.