एरंडोल(प्रतिनिधि) येथील केवडीपुरा भागातून श्याम जगदीश पवार वय २९वर्षे हा तरुण कोणास काही एक न सांगता १३जुलै २०२२रोजी घरातून कोठेतरी निघून गेला. त्याची आई बायजाबाई पवार यांनी एरंडोल पोलिस स्टेशन ला श्याम हरवल्याची तक्रार दिली आहे. हेड कॉन्स्टेबल विलास पाटील, राजेश पाटील, काशिनाथ पाटील आदी करीत आहेत.