चितोडरोड स्मशानभूमी येथे गॅस शवदाहिनी कामाचा शुभारंभ, आ.फारुख शाह यांचे हस्ते संपन्न..

0

धुळे ( अनीस खाटिक )
धुळे महानरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांचा विकास योजनेअंतर्गत चितोड रोड अमरधाम येथे शवदहिनी साठी व इतर उपकरणे तसेच शेड चे बांधकाम साठी आमदार फारुक शाह यांच्या प्रयत्नाने देवपू

र अमरधाम व चितोड रोड अमरधाम साठी एक कोटी आठविस लक्ष रुपये मंजूर करून आणले होते आज चितोड रोड अमरधाम येथील कामाचे शुभारंभ आमदार फारुक शाह यांच्या हस्ते करण्यात आले. धुळे शहरात कोरोना काळात अनेक लोकांचे निधन झाले त्या वेळी त्यांच्या अंत्यविधी साठी अमरधाम सुद्धा कमी पडत होते तसेच कोरोना बाधित रुग्णांना आक्सिजन ची आवश्यकता होती त्या वेळी आमदार साहेबांनी मोठ्या प्रमाणात शासना कडून निधी आणला होता त्याचीच परिणती म्हणून आज चितोड रोड अमरधाम येथे आमदार फारुक शाह यांच्या हस्ते या कामाचे शुभारंभ करण्यात आले धुळे शहरात विकासा साठी आमदार फारुक शाह यांनी कोणताच भेदभाव न करता प्रत्येक समाजाला न्याय कसा मिळेल याचा साठी प्रयत्न केले आहे या वेळी या भगातील नागरिकांनी आमदार फारुक शाह यांचे आभार मानले व सत्कार केला.याप्रसंगी आ.फारुख शाह यांच्या सोबत डॉ. दिपश्री नाईक,डॉ.बापुराव पवार,दै.नवराज्य चे संपादक सुनिल पाटील,दै.श्रमराज्य संपादक अतुल पाटील,दै. खान्देश मैदान चे संपादक मनोज गर्दे, कॉ.एल.आर.राव,भगवान वाघ,गौतम पगारे,डॉ.शकील देशमुख,प्यारेलाल पिंजारी,निजाम सैय्यद,इकबाल शाह,राकेश गाळनकर,शास्री नगर मधील दिपकुमार साळवे,.बाजीराव खैरनार, रमेश वाघ, नेरकर सर, प्रमोद पाटकर, बाळासाहेब निकुंभ, भरत परदेशी, वसंत वाघ, राजेंद्र चितोडकर, खैरनार सर,अजहर सैय्यद, सउद आलम,फैसल अन्सारी, शहजाद मन्सुरी,शाहरुख कुरेशी,आदी उपस्थित होते.यावेळी मनोज गर्दे,सुनिल पाटील,भगवान वाघ, यांनी मनोगत व्यक्त करतांना आ.शाह यांच्या कामाची स्तुती केली.राकेश गाळणकर यांनी सूत्रसंचालन केले व दीपकुमार साळवे यांनी आभार मानले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!