मंगळग्रह सेवा संस्थेस रेडिओ सिटीचा उत्तर महाराष्ट्र स्तरीय सिटी आयकॉन अवॉर्ड जाहीर…!

अमळनेर ( प्रतिनिधि )
अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थेस रेडिओ सिटी 91.1 एफएम या लोकप्रिय रेडिओचा उत्तर महाराष्ट्र स्तरीय सिटी आयकॉन अवॉर्ड जाहीर झाला आहे.
खरे तर दोन दिवसांपूर्वीच

आम्हास या आनंददायी बाबीचा मेल प्राप्त झाला होता . आठ दिवसांपूर्वीच रेडिओ सिटीतील माझे जुने सन्मित्र मा. श्री. प्रसाद गिरासे यांनी या अवॉर्डच्या शक्यते बाबत मला पुसटशी कल्पना दिली होती. मात्र मी अवॉर्ड बाबत आशंकीत होतो .
91.3 एफ एम ने दोन दिवसांपूर्वीच दिलेल्या सुखद धक्क्यातून सावरत नाही तोच 91 .1 एफ एम चा या सुखद धक्क्याने आम्ही हरकून गेलो आहोत.
18 जुलै 2023 रोजी नाशिक येथील ग्रँड रिओ हॉटेल येथे सिने अभिनेता सिद्धार्थ जाधव, श्वेता गुलाटी आणि परितोष पेंटर यांच्या शुभहस्ते सायंकाळी एका शानदार समारंभामध्ये हा अवॉर्ड संस्थेस दिला जाणार आहे…!
आम्हास अवॉर्ड योग्य समजल्याबद्दल आम्ही रेडिओ सिटी चे मनस्वी ऋणी आहोत…!!
हा दिमाखदार अवॉर्ड आम्हाला भावी काळात निश्चितच ऊर्जादाई व प्रेरणा स्रोत ठरेल .श्री मंगळदेव ग्रहाने आम्ही करीत असलेल्या अल्प- स्वल्प सेवेला कबूल केल्याचे हे प्रतीक आहे. जनसामान्यांसह लाखो भक्त- भाविक आणि पर्यटकांच्या विश्वासाचे हे बळ आहे. हा अवॉर्ड आम्ही श्री मंगळदेव ग्रहाच्या चरणी आणि श्री मंगळदेव ग्रह मंदिराच्या लाखो भाविक- भक्त आणि पर्यटकांना सविनय समर्पित करतो…!!!